ब्रेकिंग न्यूज

मानेवाडी येथील त्रैवार्षिक जकाई यात्रेबाबत संभ्रम दूर . प्रशासनाचे नियम पाळून पायथ्याला ता. २३ व २४ रोजी यात्रा होणार . प्रांताधिकारी विटा यांचे अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय .

 
आटपाडी प्रतिनिधी -
याबाबत अधिक माहिती अशी की मानेवाडी येथील जकाई देवीच्या मंदिरा जवळ काही महिन्यापूर्वी दरड कोसळल्याने परिसरात धोका निर्माण झाला होता . त्यामुळे प्रशासनाने याठिकाणी यात्रा भरवण्या बाबत निर्बंध घातले होते . त्यामुळे  प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोड्मिसे यांच्या सुचनेनुसार प्रांताधिकारी विटा विक्रम बांदल  यांच्या अध्यक्षतेखाली  आज तहसिल कार्यालय आटपाडी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी प्रशासकीय यंत्रणा व यात्रेशी संबंधीत गावातील पदाधिकारी व मानकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पायथ्याला ता. २३ व २४  जानेवारी रोजी यात्रा भरवण्याचा निर्णय झाल्याने त्रैवार्षिक जकाई यात्रेबाबतचा संभ्रम दुर झाला आहे. 
बैठकीमध्ये खरसुंडी ,नेलकरंजी ,मानेवाडी येथील उपस्थित प्रतिनिधींनी यात्रेबाबत आपली भूमिका मांडली याबाबत सर्व बाबींचा विचार केल्यानंतर प्रांताधिकारी यांनी वरील प्रमाणे निर्णय जाहीर केला . 
  प्रांताधिकारी श्री बांदल म्हणाले की  ता.२३ व २४ रोजी मानेवाडी येथील जकाईदेवी मंदिराध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडतील .ता. २४ रोजी मंदिराच्या पायथ्याला निश्चित होणाऱ्या जागेवर भाविकांच्या साठी देवाचे दर्शन उपलब्ध असेल  व या परीसरात यात्रा भरवण्यात येईल मात्र कोणत्याही परीस्थित  जकाई मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल . त्यामुळे सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे .


 यावेळी तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर ,पोलिस निरीक्षक जाधव ,तालुका आरोग्य अधिकारी सौ . साधना पवार ,अभियंता एस.एच .शिर्के . यांच्यासह मानेवाडी सरपंच सौ सुवर्णा खरात , खरसुंडी सरपंच धोंडीराम इंगवले ,श्री नाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी ,नेलकरंजीचे  बाबुराव भोसले, जयदीप भैया  भोसले , चंद्रकांत भाऊ भोसले ,आप्पासो भोसले ,धोंडीराम भोसले , बबलू पाटील ,मानेवाडीचे अमोल खरात ,अमर मेटकरी ,विकास मेटकरी ,नवनाथ मेटकरी ,खरसुंडीचे विजयकुमार भांगे , राहुल गुरव , छगन साळुंखे ,शेखर निचळ पोलिस पाटील बापूराव इंगवले, ग्रामसेवक पवन राऊत व ग्रामस्थ, मानकरी उपस्थित होते . आभार गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांनी व्यक्त केले .
प्रशासनाचा जकाई यात्रा भरवण्याच्या सकारात्मक निर्णयामुळे भाविकांच्या मनात असणारा  संभ्रम दूर झाला असून उस्ताह निर्माण झाला आहे.
 भाविकांची सुरक्षा लक्षात घेवून प्रशासनाने जकाई यात्रेबाबत सर्वांशी चर्चा करून वरील प्रमाणे निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करून यात्रा पार पाडावी .
                                                                                                श्री बांदल 
                                                                                        प्रांताधिकारी विटा
Previous Post Next Post