आटपाडी प्रतिनिधी.
आटपाडी जि. सांगली येथे आज ओबीसी आरक्षण बचावासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर इंदापूर येथे घडलेल्या घटनेबाबत बंद द्वारे निषेध नोंदवण्यात आला. सर्व ओबीसींनी पुकारलेल्या या बंद व मोर्चास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळी बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली .त्यामध्ये तालुक्यातील ओबीसी, एससी, एनटी,आधी बांधव व नेते मोठ्या संख्येने सामील झाले होते .
हा मोर्चा पोलीस स्टेशन चौकात आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले .यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सरगर, यल्लापा पवार ,आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण भाऊ वाघमारे ,रणजीत आयवळे, शिक्षक नेते यु.टी.जाधव सर, भाजपचे स्नेहजीत पोतदार, दत्ता पुकळे ,प्रवीण सूर्यवंशी ,सुमनताई नागणे ,पंढरीनाथ नागणे,दादासाहेब मोटे, आबासाहेब सागर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून समर्थन देण्यात आले .मोर्चा नंतर तहसीलदार सागर ढवळे व पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना निवेदन देण्यात आले.
आटपाडी येथे ओबीसी व अन्य संघटनांच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा.
https://youtu.be/Ge2Rlf_pmrE?si=xMLMYjm-v10UNILI