ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथे ता. ११ रोजी त्रैवार्षिक धाकटी जकाई यात्रा.


खरसुंडी प्रतिनिधी 
खरसुंडी ता. आटपाडी येथील धाकटी जकाई देवीची त्रैवार्षिक यात्रा गुरुवार ता. ११ रोजी होणार आहे यात्रे निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की खरसुंडी येथे बलवडी घाटाच्या पायथ्याला सिद्धनाथांच्या पत्नी जकाई देवीचे तीर्थक्षेत्र आहे. डोंगर कपारीत निसर्गरम्य ठिकाणी धाकटी जकाई देवीचे पुरातन मंदिर आहे. त्या ठिकाणी तीन वर्षातून एकदा मार्गशीर्ष अमावस्येस श्री सिद्धनाथ आपल्याला लवाजम्यासह भेटीस जातात. या भेट सोहळ्यानिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते. गुरुवार ता.११ रोजी सकाळी ९.३० वाजता श्रींचे पालखीचे मुख्य मंदिरातून जकाई भेटीसाठी पालखीतुन प्रस्थान होणार आहे. ९.४५ वाजता जोगेश्वरी मंदिराजवळ ध्वज पूजन होणार आहे. यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले असून त्या ठिकाणी शिवानंद स्वामी प्रस्तुत भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
 तरी या यात्रेचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजन ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post