ब्रेकिंग न्यूज

आटपाडी तहसील समोर ता.४ डिसेंबर पासून बेमुदत ठीया आंदोलन आनंदराव बापू पाटील


आटपाडी प्रतिनिधी 
टेंभु योजने खालील बंदिस्त पाईपलाईनची कामे तातडीने पूर्ण व्हावी, वंचित गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी श्रमिक मुक्तिदल व समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने ता.४ डिसेंबर पासून आटपाडी तहसील कार्यालय येथे बेमुदतठीया आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती चळवळीचे निमंत्रक आनंदराव बापू पाटील यांनी दिली.
 श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होण्यासाठी लाभक्षेत्रातील गावांचा भेट दौरा करण्यात आला आहे. दुष्काळी भागातील जनतेला कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी मिळण्यासाठी चळवळीच्या वतीने २००५ व २०१६ मध्ये  आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करून समान पाणी वाटपासाठी बंद पाईप लाईन योजना मंजूर करणे भाग पाडले आहे .चळवळीच्या रेट्यामुळे २०१३ साली टेंभूचे पाणी आटपाडी तालुक्यात आले आहे. मात्र अद्यापही तालुक्यातील काही गावांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः पाणी पोहोचले नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणे आवश्यक आहे .यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.


 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी काम जलद गतीने होणे आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे .
आनंदराव बापू पाटील
 निमंत्रक
Previous Post Next Post