ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात प्रथमच डाळींबाची आरास

खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात प्रथमच डाळींबाची आरास करण्यात आली.श्री नाथ जन्माष्टमी दरम्यान करण्यात आलेली ही पुजा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
        सिध्दनाथांना सफेद रंगाचा पोशाख व देवीला डाळींबी रंगाची साडी. सभोवती डाळींबाची आरास अशी मोहक पुजा भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.या पुजेसाठी मंगलमूर्ती फ्रुट कंपनीच्या पंढरीनाथ नागणे यांनी दर्जेदार डाळींबाचा पुरवठा केला.ही पुजा बांधण्यासाठी श्री पुजक किशोर पुजारी,प्रतिक पुजारी,सतिश भांगे, गणेश पुजारी यांच्यासह अन्य पुजकांनी सहभाग घेतला.


Previous Post Next Post