ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथे वैभव दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर सिद्धिविनायक हॉस्पिटल खरसुंडी व मेहता हॉस्पिटल सांगली यांचा उपक्रम


खरसुंडी प्रतिनिधी
 राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.वैभव दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटल खरसुंडी व मेहता हॉस्पिटल सांगली यांच्या वतीने खरसुंडी येथे रविवार ता.३  रोजी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या आजारावर मोफत औषध उपचार करण्यात येणार असून गरजू रुग्णांवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे शिबिरामध्ये डॉ. अजित मेहता ,डॉ. तन्मय मेहता ,डॉ.प्रिया  मेहता, डॉ. विजय हांडे, डॉ. मुकुल द्वीवेदी, डॉ. रमाकांत मगदूम, डॉ.हेमंत लिमये सहभागी होणार असून शिबिरासाठी सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएन यांनी विशेष सहकार्य केले आहे. शिबिराचे संयोजन सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. उमेश पुजारी व डॉ. मीनाक्षी पुजारी यांनी केले आहे.


Previous Post Next Post