ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता.आटपाडी येथे श्री नाथ जन्माष्टमी निमित्त ता.६ रोजी जंगी कुस्ती मैदान.


आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथे श्रीनाथ जन्माष्टमी निमित्त बुधवार ता.६ रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. हायस्कूल रोड नजीक दुपारी चार वाजता हे मैदान होणार आहे.
 या मैदानामध्ये प्रामुख्याने प्रथम क्रमांक  रु ५१००० इनामासाठी पैलवान अभिषेक देवकर × पैलवान उमाजी चव्हाण , द्वितीय क्रमांक रु ३१००० इनामासाठी पै.सचिन माने × पै विकास पवार , तृतीय क्रमांक रु २५००० इनामासाठी पै.नाथा पवार × पै.सचिन महागावकर,चतुर्थ क्रमांक रु २१००० इनामासाठी पै.प्रताप खिलारी × पै.सोमनाथ बंडवलकर,पंचम क्रमांकसाठी रू ११००० इनामासाठी पै.रणजीत सरगर× पै.श्रीधर डुंबले यांच्यात लढती होणार आहेत.


त्याच बरोबर  स्थानिक पैलवान बलराम पुजारी,गोविंद पुजारी ,वरद पुजारी ,उदय पुजारी,अमित पुजारी,शुभम पुजारी, विक्रम कटरे, आर्यन निकम,पार्थ पुजारी,अर्जुन पुजारी,सोहम पुजारी यांच्या लढती होणार आहेत.
या लढतींचा सर्व कुस्ती शौकीनांनी लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांनी केले आहे.
Previous Post Next Post