ब्रेकिंग न्यूज

आ.गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ खरसुंडी बंद, मुकफेरी द्वारे निषेध.

आटपाडी प्रतिनिधी 
इंदापूर येथे आ. गोपीचंद पडळकर यांचे बाबत झालेल्या प्रकाराबाबत खरसुंडीत सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
इंदापूर येथील ओबीसी मेळावा उरकून पडळकर हे अन्य आंदोलकांच्या भेटीसाठी जात असताना त्यांना तेथे येण्यास मज्जाव करून चप्पल फेक करण्यात आली होती. या घटनेचे आटपाडी तालुक्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. काल करगणी येथे बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला तर आज खरसुंडीत सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी मुकफेरी काढण्यात आली.
यावेळी सरपंच धोंडीराम इंगवले, भाजपाचे जिल्हा सचिव विलास काळेबाग ,दीपक जाधव विवेक पुजारी ,दिलीप जानकर, सुभाष चोपडे, तानाजी क्षीरसागर, छगन साळुंखे, मधुकर बेरगळ,विलास जानकर, संभाजी इंगवले आदी उपस्थित होते.


मी संयमी भुमिका घेतली नसती तर संबंधीतांच्या अंगावर कपडे राहीले नसते.ओबीसी समाजाने शांततेने व अहिंसेच्या मार्गाने निषेध नोंदवावा.
आमदार गोपीचंद पडळकर 
Previous Post Next Post