ब्रेकिंग न्यूज

संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्षपदी दिघंचीचे बाळासाहेब होनराव यांची निवड

 आटपाडी प्रतिनिधी 
महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्षपदी दिघंची येथील नितीन उर्फ बाळासाहेब होनराव यांची निवड झाली आहे. पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्या शिफारशीनुसार ही निवड जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी  ही निवड केली आहे. होनराव हे आमदार अनिल भाऊ बाबर यांचे समर्थक असून जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे सहकारी आहेत. त्यांनी दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामकाज केले आहे . होनराव यांनी या पदाचा उपयोग तालुक्यातील निराधार व तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी होईल असा विश्वास व्यक्त केला  आहे .त्यांचे या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.Previous Post Next Post