ब्रेकिंग न्यूज

आटपाडी येथे रविवार तारीख 10 रोजी पंचम फिल्म च्या वतीने गदिमा लघुपट महोत्सव व बक्षीस वितरण सोहळा*

आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथे रविवार ता.१० रोजी पंचम फिल्म च्या वतीने गदिमां लघुपट महोत्सव अंतर्गत लघुपट स्क्रीनिंग व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
रविवार तारीख 10 रोजी कल्लेश्वर मंदिर सभागृहामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात महोत्सवात सहभागी १२ लघुपटाचे सकाळी ९.३० वाजता लघुपटांचे स्क्रिनिंग उद्घाटन होणार आहे तर बक्षीस वितरण व सत्कार सोहळा दुपारी ४ .३९ वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. विष्णू पाटील यांच्या हस्ते होणार आहे .कार्यक्रमास प्रदीप पाटील सर. ॲड. धनंजय पाटील, डॉ. अनिरुद्ध पत्की, डॉ. एम. वाय. पाटील, डॉ. सचिन देशमुख, डॉ.जे. एन .कदम, अभिनेते विजय देवकर उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवामध्ये विजेत्या लघुपट्यांना अनुक्रमे ७७७७,५५५५,३३३३  रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे .त्याचबरोबर उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, संकलक ,संगीत कॅमेरा, अल्बम सॉंग व डॉक्युमेंटरी तसेच बालकलाकार अशा पुरस्कारांचेही  वितरण होणार आहे. बक्षीस वितरण व सत्कार सोहळ्यास अध्यक्ष गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक श्री सुनील दबडे उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमास प्रा. विजय लोंढे ,प्रा. बालाजी वाघमोडे, रामचंद्र कोळी सो अश्विनी कासार, श्री मल्हारी जाधव ,श्री बालाजी सावकार, शफिक तांबोळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत .
यावेळी प्रगती महिला बचत गट शेरेवाडी, हरितक्रांती महिला शेतकरी गट खरसुंडी व ज्येष्ठ साहित्यिक काष्ठ शिल्पकार रमेश जावीर यांचा विशेष सत्कार होणार आहे.
 या सोहळ्यासाठी कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचम फिल्म च्या वतीने सौ अनिषा जावीर व समाधान ऐवळे यांनी केले आहे.


Previous Post Next Post