ब्रेकिंग न्यूज

आटपाडी पश्चिम भागातील गावांचा डोंगरी विभागात समावेश- शासन निर्णय मात्र पडळकरवाडी व खरसुंडी गावाचा समावेश नाही.

आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील 26 गावे डोंगर कपारीत असूनही गेली अनेक वर्षे डोंगरी विभागाच्या सुविधांपासून वंचित होती. त्यामुळे संबंधित गावांमधून डोंगरी विभागात समावेश होणे बाबत सातत्याने मागणी होत होती. याबाबत शासनाकडून सर्वेक्षणाबाबत काही त्रुटी असल्याने संबंधित गावांचा समावेश होऊ शकत नव्हता. यासाठी शासन स्तरावर काही अटी शिथील करणे आवश्यक होते.
याबाबत कै. आमदार अनिल भाऊ बाबर व विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित करून वंचित गावांचा डोंगरी विभागात समावेश करणे बाबतचा आग्रह शासन स्तरावर केला होता. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या समितीने अभ्यास करून या अटी शीथील करण्याची शिफारस केली होती. त्याप्रमाणे तारीख १३/०३/२०२४ रोजी नियोजन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार नव्याने डोंगरी विभागाच्या उपगटात आटपाडी तालुक्यातील पुढील गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये आवटेवाडी ,कामथ, कान कात्रेवाडी ,चिंचाळे , घरनिंकी ,विभूतवाडी,घाणंद, जांभुळणी, धावडवाडी ,नेलकरंजी, पारेकरवाडी, पिंपरी बुद्रुक, मुढेवाडी ,वाक्षेवाडी, वलवण, बाळेवाडी, मानेवाडी, मिटकी, तळेवाडी,हिवतड या गावांचा समावेश आहे .या गावांना डोंगरी विकास निधीतून विविध प्रकारच्या सोयी सुविधा व निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासनाने नव्याने डोंगरी उपगटात पश्चिम भागातील गावे समाविष्ट पडळकरवाडी व खरसुंडी या गावांना वगळले आहे .त्यामुळे संबंधित गावातून नाराजी व्यक्त होत आहे.
डोंगरी विभागातून वगळलेल्या पडळकरवाडी व खरसुंडी गावाचा समावेश करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू
शेखर निचळ
तालुका प्रमुख शिवसेना ठाकरे गट
Previous Post Next Post