आटपाडी प्रतिनिधी
लिंगीवरे ता.आटपाडी येथील आटपाडी पंचायत
समितीचे माजी सभापती स्व.धुळाजीराव झिंबल यांच्या पत्नी श्रीमती रखमाबाई धुळाजीराव झिंबल वय ८५ यांचे आज दुपारी १.३०च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
सायंकाळी लिंगीवरे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्या सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जनार्धन झिंबल यांच्या मातोश्री व लिंगीवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुमन झिंबल व श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल यांच्या सासू होत्या.