ब्रेकिंग न्यूज

नेलकरंजीतील श्वान शर्यतीची देशभरात चर्चा. तारीख २१ जानेवारी रोजी आयोजन.

नेलकरंजीतील श्वान शर्यतीची देशभरात चर्चा. तारीख २१ जानेवारी रोजी आयोजन.
आटपाडी प्रतिनिधी
नेलकरंजी ता. आटपाडी येथे रविवार तारीख २१ जानेवारी रोजी शेर ए हिंदुस्तान श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे .या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा थार असुन देशभरातून मोठ्या संख्येने श्वानप्रेमींची गर्दी होणार आहे. या श्वान शर्यतीची सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे.
या शर्यतीसाठी   भव्य मैदान उभारण्यात आले असून प्रेक्षकांसाठी सुसज्ज गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांकासाठी ट्रॅक्टर, तृतीय क्रमांकासाठी बुलेट, चतुर्थ क्रमांकासाठी स्प्लेंडर, पाचव्या क्रमांकासाठी एच एफ डीलक्स गाडी बक्षीस आहे. स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर देशभरातून  नोंदणी झाली असून मैदानात देशातील विविध प्रजातीच्या श्वानांची हजेरी असणार आहे .मैदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व श्वानप्रेमींनी हजर राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Previous Post Next Post