ब्रेकिंग न्यूज

आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली मंदिरांत स्वच्छता


आटपाडी प्रतिनिधी 
आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात हाती झाडू व पाईप घेऊन स्वच्छता केली.
२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्यातील सर्व मंदिरांची साफसफाई करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ, श्रीराम व जोगेश्वरी मंदिरात कार्यकर्त्यासमवेत स्वच्छता राबवली. त्यानंतर घोडेखुर व करगणी येथील प्राचीन श्रीराम मंदिरात सफाई केली. आमदार पडळकर स्वतः झाडू  हातात घेऊन सफाई मोहिमेत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुनावला आहे.
 तारीख २२ रोजी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून प्रत्येक नागरिकांनी या आनंद सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले आहे. यापूर्वी आटपाडी येथील कलेश्वर मंदिरात ही आमदार पडळकर यांनी स्वच्छता मोहीम राबवली आहे. यावेळी संबंधित देवस्थानचे पदाधिकारी, नागरिक व भाजपाच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.


Previous Post Next Post