ब्रेकिंग न्यूज

चांगभलं च्या गजरात त्रैवार्षिक जकाई यात्रा संपन्न, श्रीनाथ- जकाई भेट ,निर्बंधामुळे भाविकांत नाराजी


खरसुंडी प्रतिनिधी
नाथ जकाईच चांगभलं ...च्या गजरात त्रैवार्षिक जकाई यात्रा संपन्न झाली. भाविकांच्या प्रचंड उत्साहाला प्रशासनाच्या निर्बंधाने अडचण निर्माण झाल्याने भाविकात नाराजी जाणवली.
जकाई भेटीसाठी काल सकाळी नऊ वाजता श्रींच्या पालखीरथाने मुख्य मंदिरातून पारंपारिक व शाही थाटाच्या लवाजासह प्रस्थान केले. यावेळी रथाला दोन बैलगाड्या जंपल्या होत्या.पालखी मध्ये तांबड्या रंगाची पेशवाई पगडी, त्यावर शिरपेच ,चंद्रकोर आणि भरजरी अंगरखा व  सुवर्ण अलंकार धारण केलेली उत्सव मूर्ती विराजमान केली होती. तर मुख्य मंदिरात श्री सिद्धनाथ व बाळाई देवीची अश्वारूढ पूजा मांडण्यात आली होती. प्रस्तावनापूर्वी मानेवाडी व नेलकरंजी येथील मानकरयांनी मुख्य मंदिरात येऊन श्रींना निमंत्रण दिले.प्रस्थानानंतर गतीने पालखी सोहळा पहिला थांबा घोडेकखुर तीर्थक्षेत्रावर विसावला. या ठिकाणी मानपान व धार्मिक विधी करण्यात आले घोडेखुर येथे भाविकांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात होती. त्याचा भाविकांनी लाभ घेतला त्यानंतर घुलेवाडी येथील स्वागत स्वीकारून पालखी धावडवाडी येथे पोहोचली. प्रामुख्याने मुस्लिम लोकवस्ती असणाऱ्या या गावाने श्रींचे भव्य स्वागत केले. यावेळी परंपरेनुसार धावडवाडीतील भाविकांनी पालखीला सेवा दिली. यावेळी धावेवाडीतही भाविकांच्यि अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. धावडवाडीतील महिलांनी श्रींना औक्षण करून स्वागत केले. यावेळी देवस्थानच्या वतीने मानकरयांचा मानपान झाल्यानंतर पालखीने आवटेवाडी नंबर एक व दोन या ठिकाणचे स्वागत स्वीकारून दुपारी दोन वाजता पालखी जकाईदेवीचे माहेर असलेल्या नेलकरंजी नगरीत दाखल झाली. गाववेशी जवळ ग्रामस्थांच्या वतीने श्रींचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर महादेव मंदिराजवळील दर्शन थांब्यावर पालखी ठेवण्यात आली .या ठिकाणी भव्य मंडपात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी चार वाजेपर्यंत दर्शनासाठी रांग सुरू होती यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर अन्नदान, पाणी  व प्रसाद वाटप केले.
चार वाजता पालखीने मानेवाडी हद्दीत प्रवेश केला. या ठिकाणी मानेवाडीकरांचे स्वागत स्वीकारून व  हिवतड ,गुलालकी, मेटकरवाडी या थांब्यावर विश्रांती घेऊन सायंकाळी पालखीने जकाई दार-याकडे प्रस्थान केले. काही अंतर पार केल्यानंतर  भाविकांच्या दृष्टिक्षेपात डोंगर कुशीतील जकाई मंदिर आले लांबूनच जकाईचे मंदिर दिसल्यानंतर भाविकांचा उत्साह दुनावला .सायंकाळी साडेसात वाजता पालखी सोहळा जकाई द-यात पोहचला .पालखी जकाई मंदिरासमोर आल्यानंतर श्रीनाथ जकाई भेट संपन्न झाली. त्यानंतर नित्योपचार व शेजारती करण्यात आली.
प्रस्थान सोहळ्यासाठी श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट, पालखी मार्गावरील ग्रामपंचायत, ग्रामस्थ सेवेकरी व मानकरी यांनी परिश्रम घेतले.
जकाईदरा येथे धर्मादाय कार्यालय सांगली यांच्या वतीने यात्रेच आयोजन व नियंत्रण करण्यात आले आहे. त्याचबरोबर महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे


Previous Post Next Post