आटपाडी प्रतिनिधी
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भैया भोसले यांनी विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्याने आटपाडी तालुक्यात शिवसेनेला ताकद मिळाली आहे. नेलकरंजी येथे जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील व सुहास बाबर यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बोलताना श्री सुहास बाबर म्हणाले कै.मोहन काका भोसले यांच्या पश्चात जयदीप भोसले यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा आहे. आगामी काळात नेलकरंजी परिसरात उर्वरीत विकास कामांना न्याय देऊ. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील म्हणाले की जयदीप भोसले यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेचे बळ वाढवणारा आहे .पाठिंबा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल.
यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष बाबासो भोसले, बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य सारिका भिसे, अनिल भिंगे, सदाशिव ढगे, नेलकरंजी सोसायटीचे चेअरमन जालिंदर भोसले ,धावडवाडी सोसायटीचे चेअरमन उमर शेख, आवटेवाडी सोसायटीचे चेअरमन बाळासो खाडे , बाबासो पुजारी यांच्यासह पश्चिम भागातील कै. मोहन काका प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेलकरंजी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना जयदीप भोसले.उपस्थित सुहास बाबर, तानाजीराव पाटील व मान्यवर . |
विकास कामांना न्याय देण्यासाठी सुहास बाबर यांना पाठिंबा.
जयदीप भैय्या भोसले.
काँग्रेस तालुकाध्यक्ष