आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी श्रीमती सुवर्णा मदन पुजारी यांची तर व्हाईस चेअरमन पदी बाळासाहेब शंकर निचळ यांची बिनविरोध निवड झाली.
यापूर्वी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी आज सहकारी अधिकारी सागर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड घेण्यात आली. यावेळी जयवंत शिंदे, जगदीश पुजारी, विजयकुमार पुजारी आनंदा पुजारी ,ताई पुजारी हे संचालक उपस्थित होते. तर उर्वरित सहा संचालक अनुपस्थित राहिले.
चेअरमन व व्हाईट चेअरमन यांचे निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला.