ब्रेकिंग न्यूज

नूतन खासदार विशाल पाटील ,कुलदैवत सिद्धनाथांच्या दरबारात .


खरसुंडी प्रतिनिधी 
सांगली लोकसभेच्या आटातटीच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेले खासदार विशाल पाटील यांनी आज कुलदैवत श्री सिद्धनाथांच्या दरबारात हजेरी लावून दर्शन घेतले. काल रात्री उशिरा विजयी मिरवणूक झाल्यानंतर  खासदार विशाल पाटील यांनी आज सकाळी पलूस, कडेगाव, विटा, खानापूर येथील दौरा करून आटपाडी तालुक्यात हजेरी लावली. नेलकरंजी येथे युवा नेते जयदीप भैया भोसले यांचे स्वागत स्वीकारून त्यांचे  चार वाजता खरसुंडी नगरीत  आगमन झाले. बस स्थानक चौकात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजीत जंगी स्वागत केले.
            त्यानंतर ठिकठिकाणी स्वागत स्वीकारून त्यांनी सिद्धनाथ मंदिरात हजेरी लावली. या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ ,फेटा व सिद्धनाथांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी नूतन खासदारांबरोबर सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. दौऱ्या वेळी युवानेते जयदीप भैया भोसले ,बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, माजी सरपंच अर्जुन सावकार ,देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, खरसुंडीचे चेअरमन जगदीश पुजारी, वलवणचे चेअरमन शहाजी शिंदे ,राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जालिंदर कटरे, विजयकुमार पुजारी सर ,सचिन गुरव, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते .

खरसुंडी येथे श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेताना नुतन खासदार विशाल पाटील.


सिद्धनाथांचा आशीर्वाद व जनतेची साथ यामुळे मिळालेल्या संधीचा उपयोग सांगली जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी करेन. 
खासदार विशाल पाटील
Previous Post Next Post