ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथे सुहास( भैया) बाबर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण संपन्न. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती

खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मुख्य पेठेतील पेविंग ब्लॉक 18 लाख रुपये, बंदिस्त गटार १० लाख या कामांचा लोकार्पण सोहळा तसेच पीएमसी योजनेतून मंजूर शाळा नंबर एक व दोन साठीच्या 1 कोटी 65 लाख खर्चाच्या इमारतीचे भूमिपूजन तसेच खरसुंडी ते कामथ रस्त्याचा शुभारंभ श्री बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. .स्वर्गीय आमदार बाबर यांच्या पश्चात खरसुंडीत झालेला हा पहिलाच कार्यक्रम होता. यावेळी त्यांची उणीव कायम भासत  होती.यावेळी शाळेसाठी जागा देणारे श्री दिनकर सुभेदार भोसले यांचा व पाणी फाउंडेशन अंतर्गत तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावलेल्या हरितक्रांती महिला बचत गटांच्या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य विनोद पुजारी, माजी सरपंच अर्जुन पुजारी, विश्वास पुजारी सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी या सर्व कामांसाठी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेऊन शाळा खोल्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी त्यांच्याच प्रयत्नांनी मिळाला असल्याचे सांगितले. यावेळी श्री सुहास बाबर व तानाजी पाटील यांनी पोलिओ लसीकरण बुथला भेट देऊन लसीकरणाचा शुभारंभ केला.
कार्यक्रमास देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, वलवणचे उपसरपंच आबासो जाधव ,आप्पासो जाधव, चिंचाळेचे माजी सरपंच गजानन गायकवाड, माजी उपसभापती विलास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार विलास नाना शिंदे, माजी उपसरपंच दिलीप सवणे, बाजार समितीचे सदस्य भगवानराव पाटील, दत्तात्रय पाटील पंच, मनोज नागरे पाटील, महादेव जुगदर, अश्विनीताई कासार, विस्तार अधिकारी जगन्नाथ कोळपे, देवस्थानचे विश्वस्त विजयकुमार भांगे, माजी सरपंच सौ लता पुजारी, माजी सरपंच अर्जुन पुजारी, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी, निलेश पोमधरणे, माजी उपसरपंच जितेंद्र पाटील ,शिक्षक बँकेचे संचालक सचिन खरमाटे ,संजय गांधी निराधार योजनेचे विनोद पुजारी, उप अभियंता अशोक चव्हाण ,बंडूशेठ कातुरे, यांच्यासह शाळा नंबर १ व २ मुख्याध्यापक ,शिक्षक वर्ग ,शाळा  व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          एका कामाचे तीन वेळा भुमीपुजन ?
पी.एम.श्री.योजनेतुन मंजूर एकाच शाळेच्या इमारतीचे तीन वेळा भुमीपुजन होत आहे.काल भाजपाच्या वतीने आ.गोपीचंद पडळकर यांनी भुमीपुजन केले.तर आज शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी भुमीपुजन केले.तर उद्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तालुकाध्यक्ष शेखर निचळ उद्घाटन करणार आहेत.त्यामुळे शाळा इमारत व भुमीपुजन तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

खरसुंडी ता.आटपाडी येथे शाळा इमारत भुमीपुजन प्रसंगी सुहास भैया बाबर व तानाजीराव पाटील तसेच मान्यवर.

Previous Post Next Post