ब्रेकिंग न्यूज

टेंभू पासून वंचित बारा गावांसाठी मुंबईत आंदोलन. श्रमिक मुक्ती दल व पाणी संघर्ष चळवळीचा इशारा*

आटपाडी प्रतिनिधी
टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या आटपाडी तालुक्यातील  बारा गावां संदर्भात आज लिंगीवरे ता. आटपाडी येथे पाणी परिषद घेण्यात आली. श्रमिक मुक्ती दल व पाणी संघर्ष चळवळीचे डॉ. भारत पाटणकर व माणगंगा उद्योग समुहाचे संस्थापक आनंदराव बापू  पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेत मुंबई येथील आंदोलनाचा निर्णय जाहीर करण्यात आला.
      टेंभूच्या पाण्यापासून गुळेवाडी, विभूतवाडी, धावडवाडी, राजेवाडी, लिंगीवरे पुजारवाडी, पांढरेवाडी ,उंबरगाव, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, वलवण या गावातील क्षेत्र टेंभू पासुन वंचित आहे. टेंभूच्या लाभ क्षेत्रात असूनही या गावांना पाणी मिळाले नाही. या गावातील पाण्यासाठी लोकसभेच्या आचारसंहिते पूर्वी निधी देऊन निविदा काढण्यात यावी अशी मागणी या परिषदेत करण्यात आली. तसेच  जिहे कटापूरच्या पाणी राजेवाडी तलावात आणण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबाला आवश्यक शाश्वत पाणी बंद पाईपलांच्या माध्यमातून देणे शक्य आहे. त्यामुळे वंचित गावांसाठी तातडीने निधीची तरतूद करून कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
धुळाजीराव झिंबल हायस्कूल लिंगीवरेच्या मैदानावर झालेल्या या परिषदेत प्रारंभी माजी जि . प . सदस्य जनार्धन झिंबल यांनी स्वागत व प्रास्तावीक केले .
                यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हणमंतराव देशमुख, माजी उपसभापती साहेबराव चवरे, मनोहर विभूते, राजेवाडीचे नेते बाळासाहेब पाटील - शिरकांडे, माजी भाग शिक्षणाधिकारी हणमंतराव गुरव साहेब, राजेवाडीचे सरपंच प्रशांत शिरकांडे, पिंपरी खुर्दचे माणिकराव कदम, विभूतवाडीचे माजी सरपंच नंदकुमार इनामदार इत्यादींची जोरदार भाषणे झाली .
                आटपाडी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, राष्ट्रवादी ओबीसीचे सांगली जिल्हाध्यक्ष जालींदर कटरे, धुळाजीराव झिंबल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री झिंबल, माजी सरपंच आगतराव खांडेकर, अशोक खटके, निंबवडेचे माजी सरपंच दत्तात्रय पाटील, तडवळेचे माजी सरपंच जितेंद्र गिड्डे, माजी पं . सदस्य दादासाहेब मरगळे, शंकरराव गिड्डे तडवळे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ता यमगर बनपूरी, महादेवदाजी देशमुख शेटफळे, नाथा बाड विठलापूर, भिमाशंकर स्वामी, किरण लोहकरे, संतोष गोटल, विभूतवाडीचे सरपंच सुरज पाटील, नाना मोटे, सुखदेव खताळ विभुतवाडी , शंकरराव गळवे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. आभार दैनिक प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके यांनी मानले .

लिंगीवरे ता.आटपाडी येथे टेंभु योजने पासुन वंचित
गावांसाठी आयोजित पाणी परिषदेत डॉ.भारत पाटणकर, आनंदराव बापू पाटील व मान्यवर.

Previous Post Next Post