ब्रेकिंग न्यूज

जि. प. शाळा चिंचाळे येथील विद्यार्थ्यांची खरसुंडीत क्षेत्रभेट. विद्यार्थ्यांनी घेतली दवाखाना, पोस्ट, बँक, संग्रहालय व पोलीस स्टेशनची माहिती.

खरसुंडी प्रतिनिधी
चिंचाळे ता. आटपाडी येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांची आज खरसुंडी येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना  पुस्तकी ज्ञानापेक्षा बरोबरच व्यवहार ज्ञान मिळावे या उद्देशाने या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, विटा अर्बन क्रेडिट सोसायटी ,पोस्ट या ठिकाणी भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी संस्थांच्या कामकाजाबाबत विविध प्रश्न विचारून आपले शंका निरसन केले.त्यानंतर जावीर काष्ठशिल्प संग्रहालयामध्ये भेट देऊन काष्ठशिल्प व चित्र प्रदर्शनाचा अनुभव घेतला.
या क्षेत्रभेटीमुळे मुलांच्या प्राथमिक ज्ञानामध्ये भर पडून त्यांना दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी संस्थांची माहिती मिळाली. या भेटीचे आयोजन मुख्याध्यापक जितेंद्र कनाके व उपशिक्षक रवींद्र पिसे यांनी केले होते.

खरसुंडी येथील जावीर काष्ठशिल्प संग्रहालयामध्ये माहिती घेताना जि.प‌.शाळा. चिंचाळेचे विध्यार्थी.


Previous Post Next Post