आटपाडी प्रतिनिधी
चुकीच्या पद्धतीने जप्ती आदेश लागू केल्याबद्दल महाराष्ट्र बँक व महसूल विभागाच्या विरोधात आटपाडीत शेतकऱ्यांचे उपोषण.
याबाबत अधिक माहिती अशी की बँक ऑफ महाराष्ट्र आटपाडी शाखेच्या वतीने सावित्रीदेवी कॉटन आणि ऑइल मिल या उद्योगास कर्ज देण्यात आले होते त्या पोटी बँकेत तारण म्हणून 25/,अ व 25/ ब या मिळकतींचे गहाणखत दिनांक 2 डिसेंबर 2017 रोजी बँकेने करून घेतले होते. सदरच्या कर्जाची थकबाकी झाल्यानंतर बँकेने वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मात्र यामध्ये आंदोलन कर्ते शेतकरी शहाजी यशवंत जाधव, मुरलीधर आप्पा पाटील, सुधाकर बापूराव सागर यांचे क्षेत्र तारण नसताना बँकेने महसूल विभागाच्या माध्यमातून चुकीच्या क्षेत्रावर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे सदरची कारवाई मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आजपासून बँक ऑफ महाराष्ट्र आटपाडी शाखेचे समोर उपोषण सुरू केले आहे .
उपोषणास जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, बहुजन वंचित आघाडीचे अरुण वाघमारे ,बळीराजा संघटनेचे डॉ उन्मेश देशमुख, राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
गहाणखतामध्ये आमच्या मिळकतींचा समावेश नाही. त्यावर आमच्या सह्या नाहीत असे असताना बँकेने माननीय जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून चुकीचे आदेश मिळवले आहेत.
आंदोलक शेतकरी