आटपाडी प्रतिनिधी
गेली अनेक वर्षांपासून नूतनीकारणाच्या प्रतीक्षेत असलेल्या आटपाडी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी परिवहन खात्याकडून तब्बल 5 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी आटपाडी बस स्थानक सुसज्ज व प्रशस्त व्हावे यासाठी परिवहन विभागा कडे निधीची मागणी केली होती.त्यावर परिवहन विभागाने आटपाडी च्या बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपये एवढा भरीव निधी मंजूर केल्याची माहिती सुहास बाबर यांनी दिली.
मतदार संघातील विटा, आटपाडी आणि खानापुर या तिन्ही महत्वाच्या शहरातील बसस्थानके सुसज्ज व्हावीत, त्यांचे नूतनीकरण व्हावे यासाठी स्वर्गिय आमदार अनिलभाऊ बाबर व तानाजीराव पाटील प्रयत्नशील होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री महोदयाकडे निधीची मागणी देखील केली होती. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर यांनी आटपाडी बस स्थानकासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला.त्याची दखल घेत् परिवहन विभागाने आटपाडी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपये एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे.
मंजूर झालेल्या निधी मधून आटपाडी बस स्थानकामध्ये बारा फलाट करणे, रेस्ट रूम, गेस्ट रूम, टॉयलेट ब्लॉक, स्टॅन्ड इन्चार्ज रूम, पासेस रूम तसेच अंतर्गत काँक्रिटीकरण अशी कामे होणार आहेत.अनेक वर्षांपासून आटपाडी बसस्थानक सुसज्ज व्हावे अशी इच्छा नागरिकांची होती.याची दखल स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी घेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचेकडे निधीसाठी पाठपुरावा देखिल केला होता.परंतु त्यांचे अकास्मित निधन झाल्याने बस स्थानकच्या निधीला ब्रेक लागला परंतु माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी आटपाडी बस स्थानकच्या पुनर्बांधणीसाठी मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेकडे पाठपुरावा सुरु ठेवला. त्याची दखल घेत मुख्यमंत्री महोदयांनी परिवहन विभागामार्फत आटपाडी बसस्थानकच्या पुनर्बांधणी साठी पाच कोटी एवढा भरीव निधी मंजूर केला आहे.
अनेक वर्षापासुन आटपाडी बस स्थानकामध्ये सुविधांची करमतरता आहे. परंतु आता मंजूर झालेल्या 5 कोटी एवढ्या भरीव निधितुन् सुसज्ज असे बसस्थानक दिमाखात आटपाडी येथे उभे राहणार असून नागरिकांची व प्रवाशांची सोय तर होणार आहेच परंतु यामुळे आटपाडीच्या वैभवात देखील भर पडणार आहे.त्याचबरोबर येत्या काळात आटपाडी आगारासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
सुहास बाबर
जिल्हा नियोजन समिती सदस्य.