खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत आज दुपारी सासनकाठी व पालखी सोहळा संपन्न होत आहे.या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक नाथ नगरीत दाखल झाले आहेत.आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने श्रीं ची अश्वारूढ पूजा बांधण्यात आली आहे.काल मध्यरात्री पासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे.गावोगावच्या सासणकाठ्या दाखल झाल्याने चांगभलं व पारंपारिक वाद्यांच्या गजराने खरसुंडी दुमदुमून गेली आहे.या संपुर्ण सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण आटपाडी न्यूज लाईव्ह च्या माध्यमातून होत आहे. त्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.
खरसुंडी ता.आटपाडी येथील मुख्य मंदिरात सासणकाठी व पालखी सोहळ्या निमीत्त बांधण्यात आलेली अश्वारूढ पूजा. |
https://youtube.com/live/ce7iKhlAsTw?feature=share