ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथे दलित महिलेचे घर बळकवल्याची आमदार पडळकर यांच्याकडे तक्रार,

खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी येथे दलित महिलेचे घर बळकवल्याची आमदार पडळकर यांच्याकडे तक्रार,पडळकर यांच्या पोलिसांना त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना.


 याबाबत अधिक माहिती अशी की आज खरसुंडी येथे आ.गोपीचंद पडळकर हे संविधान दिन व मन की बात कार्यक्रमा निमित्त खरसुंडी येथे आले होते.कार्यक्रमा नंतर परतताना एका महिलेने पडळकर यांना गाठले व आपले घर एका व्यक्तीने बळकवल्याने बेघर झाल्याची व्यथा मांडली .
यावेळी महिलेच्या डोळ्यातील अश्रू पाहून पडळकर यांनी त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.पडळकर यांच्या या तत्परतेने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
Previous Post Next Post