ब्रेकिंग न्यूज

खरसुंडीतील कुस्ती मैदानात पै.अभिषेक देवकर, विजयी दीडशेहून अधिक निकाली कुस्त्या


खरसुंडी प्रतिनिधी
  खरसुंडी ता. आटपाडी येथे श्रीनाथ जन्माष्टमी निमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात कै. बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्र बेनापुर चा मल्ल अभिषेक देवकर यांनी प्रतिस्पर्धी पै. उमाजी चव्हाण यास एकचाक डावावर चित्रपट करून प्रथम क्रमांकाचे रु ५१  हजार इनाम प्राप्त केले. काही मिनिटातच झालेल्या या निकाली कुस्तीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
द्वितीय क्रमांक साठी पै. सचिन माने विरुद्ध पै. विकास पवार यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. तृतीय क्रमांकासाठीच्या कुस्तीत पै. नाथा पवारने आपला प्रतिस्पर्धी सचिन महागावकर यांच्यावर घिस्सा डावाने मात केली. कै. बाळासाहेब शिंदे  कुस्ती संकुलाच्या नाथा पवार वर यावेळी कुस्ती शौकीनांनी बक्षीसांचा वर्षाव केला.
 पाचव्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत सिद्धनाथ कुस्ती केंद्र शेटफळेचा मल्ल रणजीत सरगर यांनी विजयी प्राप्त केला. त्यांनी आपला प्रतिस्पर्धी श्रीधर डुबले याच्यावर मात केली. त्याचबरोबर मैदानात दीडशेहून अधिक निकाली व प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या .सुरुवात उपस्थित मल्ल  व मान्यवरांच्या हस्ते कै. सिताराम बापू पुजारी व सिद्धनाथाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मैदानामध्ये स्थानिक पैलवानांनी निकाली कुस्त्या करून कुस्ती  शौकीनांची  वाहवा मिळवली. मैदानास डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील ,माजी आमदार ॲड. सदाशिव भाऊ पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी भेट दिली.
 मैदानात पै. राजेंद्र  शिंदे बेनापुर, पै. रवींद्र गायकवाड शेटफळे, पै. बुवा बडरे आटपाडी, पै. संदीप देशमुख आटपाडी, पै. पंकज तनपुरे, पै.प्रमोद भोसले नेलकरंजी, पै.शंकर पाटील, पै.गाढवे दिघंची, पै. तामखडे यांच्यासह स्थानिक वस्तादांनी पंच म्हणून कामकाज पाहिले. मैदानामध्ये सर्व वस्तादांचा सत्कार करण्यात आला.
         कुस्ती मैदानाचे संयोजन व यशस्वीतेसाठी सरपंच ,उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले मैदानाचे उत्कृष्ट समालोचन ज्योतीराम वाजे सर सांगली यांनी केले.

खरसुंडी येथील कुस्ती मैदानाची क्षणचित्रे 

Previous Post Next Post