ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

खरसुंडी प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त खरसुंडीत विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. आज सकाळी आंबेडकर नगर येथे बौद्ध मंदिरात प्रतिमा पूजन व बुध्दवंदना घेण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच धोंडीराम इंगवले ,उपसरपंच राजाक्का कटरे, सदस्य सुभाष केंगार ,विक्रम भिसे, नंदिनी केंगार ,बौद्धाचार्य दगडू भिसे ,विजय भांगे,दिपक जाधव यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.
 त्यानंतर ग्रामपंचायत समोरील पटांगणात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी सरपंच धोंडीराम इंगवले व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी उपसरपंच राजाक्का कटरे ,सदस्य सुभाष केंगार ,किरण पुजारी, सुभाष माळी,  शफिक तांबोळी, नंदिनी केंगार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, बाजार समितीचे संचालक शंकर भिसे ,माजी उपसरपंच दिलीप सवणे ,काष्ठ शिल्पकार रमेश जावीर, सचिन भांगे, माजी उपसरपंच अर्जुन सावकार ,मोहन भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी शालेय मुलांनी लाठीकाठी व लेझीम प्रात्यक्षिके सादर केली त्यास उपस्थित त्यांनी दाद दिली. ठिकठिकाणी जयंतीनिमित्त अभिवादन करणारे फलक लावण्यात आले आहेत.

खरसुंडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना मान्यवर.



Previous Post Next Post