ब्रेकिंग न्यूज

कोळे मठाचे ३० वे मठाधिपती कोळेकर महाराज शिवैक्य


आटपाडी प्रतिनिधी
कोळे ता. सांगोला येथील रुद्रपशुपती मठाचे ३० वे मठाधिपती श्री श्री श्री १०८ कोळेकर महाराज यांचे वयाचे ६१ व्या वर्षी अल्प आजाराने कोल्हापूर येथे शिवैक्य झाले .
त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भक्तामध्ये शोककळा पसरली आहे .
त्यांचे मूळ गाव निमसोड जि. सातारा येथे असून जन्म ४ फेब्रुवारी १९६२( वसंतपंचमी) या दिवशी माहुली येथे झाला. १९७३ मध्ये वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा निमसोड येथे पट्टाभिषेक करण्यात आला.
त्यानंतर त्यांनी काशी जगद्गुरु चंद्रशेखर महाराज यांचे मार्गदर्शनाखाली जंगमवाडी मठात धार्मिक व अध्यात्मिक शिक्षण पूर्ण केले. तदनंतर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कोळेकर मठाचे माध्यमातून धर्म जागृतीचे कार्य अखंडपणे केले. त्यांचे गुरुतत्त्वाखाली तेरा ठिकाणी अग्नी होम, निमसोड येथे दोन वेळा कोटी बिल्वार्चन, मुंबई व अन्य ठिकाणी परम रहस्य पारायण शिवदीक्षाविधी तसेच कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी असे उपक्रम राबवून धर्मप्रसार केला.सन २०१७ मध्ये त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ३१व्या महाराजांचा पट्टाभिषेक करण्यात आला होता.
३० मे रोजी प्रकृती अस्वस्थ त्यामुळे त्यांना मिरज येथील सेवासदन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथील डायमंड रुग्णालयात हालवण्यात आले होते .आज सकाळी 11 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली शुक्रवार ता.१४ रोजी दुपारी कोळे येथे त्यांचेवर भस्म समाधी विधी होणार आहे.

रूद्पशुपती कोळेकर महाराज

Previous Post Next Post