ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथे जि.प.शाळेच्या इमारतीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते भूमिपूजन

खरसुंडी ता. आटपाडी येथील जि .प. शाळा नंबर १ व २ नूतन इमारतीसाठी केंद्र पुरस्कृत पी. एम. श्री .योजनेतून १कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे .या इमारतीचे भूमिपूजन आ. गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील, सरपंच धोंडीराम इंगवले, उपसरपंच राजाक्का कटरे व मान्यवर उपस्थित होते.
        यावेळी बोलताना अनिल पाटील म्हणाले की आमदार पडळकर यांच्या माध्यमातून तालुक्यात सर्वांगीण विकास होत आहे .मात्र खरसुंडी गावावर त्यांचे विशेष प्रेम असल्याने या ठिकाणी सातत्याने विकास कामांचे उद्घाटन होत आहे .
सरपंच धोंडीराम इंगवले म्हणाले की शिक्षणासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील आहे. शाळेचे काम दर्जेदार व जलद गतीने व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
        यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की खरसुंडी गावाचा विचार करता या ठिकाणी दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे .या इमारतीच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध होतील त्यानंतर आवश्यक सर्व कामांसाठी निधीची अडचण पडणार नाही. यापुढे तालुक्यात एक ही शाळा निधीपासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था करु . त्याबरोबर खरसुंडी ग्रामपंचायतने मागणी केलेल्या सर्व कामांना निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली त्याचबरोबर शाळेचे काम दर्जेदार व लवकर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य शफिक तांबोळी ,जनाबाई केंगार, किरण पुजारी ,रतन शिंदे ,नंदिनी केंगार, सुभाष केंगार ,बाजार समितीचे संचालक शंकर भिसे ,गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे, विस्तार अधिकारी जगन्नाथ कोळपे ,शाळा नंबर १ व २ चे मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व आभार अनिल जरंडकर यांनी तर सूत्रसंचालन भाजपा जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग यांनी व्यक्त केले.
 विकास कामात राजकारण नाही, घोडेखुर येथे शासनाचे निधीतून १ कोटी २५ लाखांचे काम सुरू आहे. या कामात कोणीही आडवे पडू नये अन्यथा कारवाई करावी लागेल .
आमदार गोपीचंद पडळकर.

खरसुंडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर व मान्यवर.

Previous Post Next Post